Ad will apear here
Next
स्वत:चं मूल्यमापन
‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा’ हे विनोद बिडवाईक यांनी लिहिलेले पुस्तक व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करते. प्रत्येकाला स्वतःची ओळख होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
.........
‘डेनिस दि मेनिस’चं एक कार्टून बघण्यात आलं. त्यात मॅगी, डेनिसची मैत्रीण डेनिसला सांगते, ‘काही दिवसांनंतर मी कोणाचे कोण (who’s who) मध्ये असेन? हे ऐकून डेनिस त्याच्या जॉय नावाच्या मित्राला सांगतो, ‘सर्वप्रथम तिला कशाचं काय? आणि कोणाचं कोण? हे कळू दे!’

आयुष्यात प्रसिद्ध व्हायचं असेल, निदान यशस्वी लोकांच्या who’s who यादीत नाव यावंसं आपल्याला वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला कशाचं काय आणि कोणाचं कोण, हे माहीत हवं. सर्वप्रथम तुम्ही कोण, हे तुम्हाला माहीत असायला हवं. 

स्वतःला समजून घेणं हे अतिशय कठीण असतं. परंतु स्वतःला समजून घेऊन आपल्यातले दोष घालविणे त्याहूनही कठीण असतं. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं. 

आपण स्वतःला रोज आरशात बघतो. प्रतिबिंब बघून स्वतःच खूष होतो. (त्यात ती तरुणी असेल, तर आरसाही खूष होतो, हे एका कवीचं मत!) परंतु बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा स्वतःचं अंतर्व्यक्तिमत्त्व आपल्याला समजायला हवं. 

जेव्हा आपण आपल्याबद्दल विचार करायला लागतो, तेव्हा एकूण सर्व घटकांचा विचार करावा लागतो. यामध्ये 

‘तुम्ही कोण आहात, कसे आहात?’
‘तुम्ही स्वतःला कोण व कसे समजता?’
आणि ‘दुसऱ्यांचं तुमच्याबद्दल काय मत आहे?’

हे तीन घटक विचारात घ्यावे लागतात. परंतु यामध्ये ‘तुम्ही कोण आहात व कसे आहात?’ हा घटक खरा आणि सेल्प इव्हॅल्युएशनचा घटक असतो. तुमचं तुमच्याबद्दल मत कसंही असू शकेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो. दुसऱ्याचं तुमच्याबद्दलचं subjective अथवा objective मत असतं. हे सर्व घटक एकत्र झाल्यास ‘तुम्ही काय व कोण होऊ शकता,’ या तुमच्या स्वतःच्या मताला जन्म देऊ शकतात. 

व्यक्तिमत्त्व विकासात ‘स्वतःची ओळख’ ही महत्त्वाची पायरी आहे. स्वतःबद्दल तुमचं मत आत्मविश्वासपूर्ण नसेल, तर यश दूरच असं समजा. तुम्ही स्वतःला समजून घेत नसाल, तर तुमची प्रगतीही होणार नाही. व्यक्तिमत्त्व विकास ही मानसशास्त्रीय term आहे. व्यक्तिमत्त्व प्रगतीचा विचार आपण करायला हवा. 

मग तुम्ही स्वतःला समजून कसं घेणार? यावरही उपाय आहे. तुमच्यात स्वतःला शोधा. तुम्ही कोण आहात, याचा शोध घ्या. प्रभावी घटक कोणते, तुमच्यात प्रभावी गुण (strength) कोणते ते शोधा. तुमची कमतरता बघा (weaknesses). तुमचा स्वतःचा दृष्टिकोन कसा आहे या जगण्याबद्दल, याचा तटस्थपणे विचार करा. 
स्वतःबद्दल दुसऱ्यांची मते काय, हेही समजून घ्या. 

लोक काय म्हणतात, अथवा माझे सहकारी काय म्हणतात, याचे मला ‘देणे घेणे नाही’ असं सांगणारी खूप माणसे आपल्या सभोवती असतात. हा विचार आत्मकेंद्रित झाला. तुम्ही काय करता, या प्रश्नाला हे उत्तर ठीक आहे. परंतु तुम्ही कसे आहात, या प्रश्नाला हे उत्तर देण्यात येत असेल, तर व्यक्तिमत्त्व विकास अशक्य आहे. 
आपलं स्वतःचं मन आणि मेंदू वेगवेगळा असतो. मनात वेगळं असतं, डोक्यात वेगळं असतं. मन आणि डोकं एक झालं की माणूस कणखर बनतो. त्या वेळी हे सर्व वेगवेगळे विचार घेऊन आलेलं असतं. खूप प्रश्न समोर असतात. अभ्यास, मेरिट लिस्ट, नोकरी, व्यवसाय, समाधान, करिअर, बायको-मुले, कुटुंब वगैरे वगैरे... अशा वेळेस या स्टेजला माझ्या priorities काय आहेत याचा आपण कधी विचार करतो? तुम्ही कधी याचा विचार केलाय? या पद्धतीने स्वतःला समजून घेतलंय? नसेल तर खाली दिलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं द्या. काही प्रश्नांना ‘कधी कधी’ हे उत्तर चालणार नाही. 

माझ्यात आणि माझ्या विचारांत अजूनही बालिशपणा आहे?

मैत्रीपूर्ण संबंध मी ठेवलेत?

माझ्या भावना मी योग्य वेळी व्यक्त करतो?

मला ज्याचा अभिमान आहे, असा एक तरी गुणधर्म माझ्यात आहे?

माझ्या भावनांवर माझे नियंत्रण आहे?

मी न घाबरता, न लाजता लोकांशी संवाद साधू शकतो?

माझे छंद हे productive आहेत? समाधान मिळण, हे सुद्धा यामध्ये गृहीत आहे. 

मला/माझ्या कुटुंबीयांत एकमेकांबद्दल आदर व प्रेम आहे?

सामाजिक जाणिवा मी ठेवून आहे?

मी माझ्या प्रकृतीची काळजी घेतो?

वरील प्रश्न प्रातिनिधिक आहेत. विचार करा.

(‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा’ हे विनोद बिडवाईक यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZOKCH
Similar Posts
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारातून मोठेपणी त्याचे व्यक्तिमत्त्व तयार होते. व्यक्तिमत्त्व विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असूनही ती कशी घडते हे आपल्याला कळत नाही. हा विकास कसा घडत जातो, व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या सर्व संकल्पना विनोद बिडवाईक यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज’मधून सोप्या भाषेत समजवून दिल्या आहेत
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा यशाकडे जाण्याचा मार्ग खडतर असू शकतो मात्र अशक्य नसतो. यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर स्वयंविकास हे आहे. स्वयंविकास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर विनोद बिडवाईक यांच्या या पुस्तकात मिळते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि कमतरता ओळखून त्यानुसार विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
वन मॅन शो - दिलीपकुमार यांचा ‘गंगा-जमुना’ कोणत्याही सिनेमाची कथा ऐकण्याची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते. अशा कथा सांगणारी बरीच मंडळी असतात; मात्र चित्रपटांच्या पडद्यामागच्या कथा सांगणारी माणसं विरळाच. ‘‘शिणेमाच्या ष्टोरी’मागील गोष्ट’ या अभिजित देसाई यांच्या पुस्तकात अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या चटकदार आणि मजेशीर कथा वाचायला मिळतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language